सामाजीक कार्यकर्ते यश चव्हाण यांचे शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी अनसिंग येथे पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन

फुलचंद भगत
वाशिम : अनसिंग येथे जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारे पिण्याच्या पाण्याचे काम त्वरीत पुर्ण करुन नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिवन प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देवून सुध्दा मागणी पूर्ण न झाल्याने दि. 10 जानेवारी रोजी सामाजीक कार्यकर्ते यश चव्हाण यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

अनसिंग येथे जल जीवन मिशन अंतर्गत 2022 मध्ये चालू करण्यात आलेले काम करारनाम्याची तारीख उलटून सुध्दा सुध्दा अध्यापही पूर्ण झाले नाही. जुनी पाईपलाईन सर्व फुटल्यामुळे नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची अडचण येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी शुध्द पिण्याचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आदोलन करण्यात आले. या आंदोलनात अमोल पोहरकर, सागर गव्हाणे, गोपाल ढोके, गजानन नंदावरे, अनंता ढोके, रमेश पुरी, ज्ञानेश्वर ढोके, अमोल गायकवाड, कैलास गोरे, पुथ्वीराज माळवी, संतोष खंडारे, नितीन चव्हाण, पवन पोहरकर, शुभम सोनुने, अर्जुन डोईजड, बादल राजुरकर, ओमकार काळे सहभागी झाले होते. यावेळी पोलिसाचा बंदोबस्त तैनात होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top