सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 04 आरोपीना जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातुन गुन्हयातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिने असा रु.4,00,015/- रुपयांचा मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

जालना/कादरी हुसैन: दि:15/01/2025 रोजी 18:00 वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी नामे सचिन सुरेश खडेकर, वय-50 वर्ष, रा. गोपालपुरा, जालना यांना सिंधी काळेगाव समोरील रस्त्यावर मोटार सायकलवरुन खाली पाडुन त्यांच्या ताब्यातील रु.4,75,000/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रु.55,000/- रोख रक्कम असा मुददेमाल असलेली काळी बॅग हिसकावुन घेवुन गेल्याची घटना घडल्याने फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल साहेब यांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक श्री.पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने पथके स्थापन करुन गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरची जबरी चोरी ही आरोपी नामे गणेश शेजुळ रा. वाल्मिकनगर, जालना यांने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केली आहे.
दिनांक 18/01/2025 रोजी सदर माहितीच्या अनुषंगाने 1) गणेश महादेव शेजुळ, वय-22 वर्ष, रा. वाल्मिकनगर, जालना यास ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सदरचा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार नामे 2) विशाल अजयसिंग राजपुत, वय-20 वर्ष, रा. लोधीमोहल्ला, जालना 3) जयेश किशोर राजपुत वय 22 वर्ष रा. गांधीनगर, जालना 4) अभिजित राजेश पवार, वय-22 वर्ष, रा.रामनगर, जालना यांच्या मदतीने केला असल्याची कबुली देवुन गुन्हयातील जबरी चोरी केलेला मुददेमाल रु.3,72,015/- रुपये किंमतीचे विविध वर्णनाचे सोन्याचे दागिने व रु.15000/- रोख रक्कम व रु.15000/- किंमतीचा आरोपीने गुन्हयात वापरलेला मोबाईल असा एकुण रु.4,00,015/- किंमतीचा मुददेमाल काढून दिला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुरेश उनवणे, सपोनि, योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, भाऊराव गायके, गोपाल गोशिक, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, गणपत पवार, ईरशाद पटेल, सतिष श्रीवास, देविदास भोजने, रमेश काळे, संदीप चिंचोले, कैलास चेके सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top