
जालना/कादरी हुसैन; अंबड, जि. जालना (दि. 13 जानेवारी): अंबड येथील फैसलाबाद कॉलनीमध्ये राहणारी 3 वर्षीय मुलगी इकरा अमजद शेख ही बेपत्ता झाली असून पोलिसांनी तिच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.
बेपत्ता मुलीचे तपशील दिलेले प्रमाणे आहे,
नाव इकरा अमजद शेख,
वय: 3 वर्षे 1 महिना,
शरीरबांधा सडपातळ,
उंची 2.5 फूट,
चेहरा गोल,रंग गोरा,
भाषा हिंदी,
कपडे गुलाबी रंगाचा फ्रॉक.
मुलगी हरवल्याची घटना कळताच तिच्या कुटुंबीयांनी अंबड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गु.र.नं. 22/2025, कलम 137 (2) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी आणि मुलीचे वडील शेख अमजद हाजी (मो. 8055585294) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही सदर मुलगी पाहिल्यास किंवा तिच्याबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
संपर्कासाठी दिलेले पोलीस ठाणे आणि मोबाईल क्रमांक वर माहिती द्या;
पोलीस स्टेशन, अंबड: मो. 8459610486,
तपास अधिकारी, सपोनि अमोल गुरले: मो. 9960372926,
ठाणेदार, पोनि सतिष जाधव: मो. 8805029055
पोलीस आणि कुटुंबीयांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले असून या प्रकरणात कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ वरील क्रमांकांवर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या गंभीर घटनेत समाजाने एकत्र येऊन मुलीच्या शोधामध्ये सहकार्य करावे. अशा कठीण प्रसंगी पोलिसांना पूर्ण मदत देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.