समृद्धी महामार्गावर जालन्याजवळ अपघात; पाच जण गंभीर जखमी

जालना/कादरी हुसैन

दि.08/02./2025 रोजी दुपारी 2.35 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर जालना एक्झिट पॉईंट पारसी टेकडीजवळ अपघात झाला आहे._
याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस  केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे यांच्यासह पोलीस अंमलदार मस्के,  ज्ञानेश्वर खराडे व एम एस एफचे दोन जवान तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले._
जालना एक्झिट पॉईंट पारसी टेकडीजवळ इनोव्हा टोयोटा कंपनीची कार (MH 43 AR 8460) मध्ये चालक समीर अब्दुल सलाम शेख (रा. दादर मुंबई) हे पाच प्रवासी प्रवाश्यांना घेऊन समृद्धीहून उतरून जालना कडे जात होते._
समोरील अज्ञात वाहनास पाठीमागून धडकून हा अपघात झाला आहे._
सदर अपघातामध्ये वाहनाचे जास्तीचे नुकसान झाले असून, 1) दुर्वांकुर विशाल नाईक 2) मनीषा विशाल नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत._
तसेच वाहन चालक 1) समीर अब्दुल शेख, 2) संस्कृती विशाल नाईक, 3) अनुष्का कुमावत हे किरकोळ जखमी झाले आहेत तर विशाल विजय नाईक हे जखमी नाही._
पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे व त्यांच्या स्टाफ ने सर्व जखमींना अपघात ग्रस्त गाडीतून काढून समृद्धीच्या अंबुलन्सद्वारे जालना येथे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार करिता तात्काळ पाठवले
जालना महामार्ग पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली समृद्धीच्या हायड्राद्वारे अपघातग्रस्त गाडी एडमिन बिल्डिंग येथे हलविले असून महामार्गावरील थांबलेली वाहतूक सुरळीत केली आहे._

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top