थार खुदनापुर येथील मंदीरात भर दिवसा चोरी गावकऱ्यांनी सेने स्टाईल पाठलाग करून चौरास पकडले

सतिश मवाळ

मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलिस स्टेशन अंतर्गत थार खुदनापुर येथे
दिनांक  १५/१/२५ दुपारी २/४५ ला २ चोरांनी खुदनापुर येथील श्री शंकर महादेव यांच्या मंदिरातील त्रिशुळ आणि घंटा चोरी करुन निघून जात असतांना  जवळच्या शेतात काम करतांना एकाच्या लक्षात आले असता त्याने मंदिरात जाऊन पहाणी केली असता त्रिशुळ चोरी गेल्याचे समजले तेंव्हा ते चोर आडमार्गाने शेतातुन जोरात पायी चालत होते सदरच्या मुलाने त्याला आवाज दिला असता ते पळायला लागले आणि त्रिशूळ व घंटा एका पिशवीत रोड जवळच्या तुरीच्या शेतात ठेवून पळायला लागले व चोरांनी त्यांचा एक साथीदार याला मोटरसायकल रोडवर बोलावून मंगरूळ कडे सुसाट निघाले तोपर्यंत ज्याने चोराचा पाठलाग करतांना गावात फोन करून त्रिशुळ चोरीची कल्पना दिली मग सर्व गावकरी मोटरसायकल घेऊन त्यांचा पाठलाग केला असता सावरखेड च्या बस स्टॉप अडवून ३ चोरांना खुदनापुर तेथे घेऊन आले जानेफळ पोलिस स्टेशनला घटनेबद्दल माहिती दिल्या असता पोलीस गाडी घटनास्थळी आली  सदर गावकऱ्यांनी चोरास स्वाधीन केले .
महादेव मंदिरात २ वेळा दान पेटी  आणि चांदीचे नाग चोरी करून गेल्याची घटना घडली आहे.

पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीतील  ग्राम खुदनापूर येथे दिनांक १५/०१/२०२५ रोजी दुपारी गावातील महादेवाच्या मंदिरातून  मंदिरातील काही वस्तू चोरी झाल्याची घटना घडली असून सदर प्रकरणी जानेफळ पोलिसांनी गावकऱ्यांच्या वतीने तक्रार दाखल करून
आरोपी नामे उमेश रमेश मोरे वय 24 वर्ष, महेश रमेश मोरे वय 22 वर्ष तसेच अल्पवयीन बालक नामे चेतन गणेश सोनवणे सर्व राहणार मिलिंद नगर मेहकर यांना ताब्यात घेतले असून आरोपींकडून मंदिरातील पितळी त्रिशूल व डमरू तसेच काशा धातूचा घंटा असा एकूण 5700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
जानेफळ पोलिसांनी यातील ०२ आरोपी यांना  नमूद गुन्ह्यात  अटक केली असून अल्पवयीन बालकास बाल न्याय मंडळ येथे हजर करीत आहोत. सदरची चोरी करणारे चोर पकडण्यात खुदनापूर येथील गावकऱ्यांनी मोलाची मदत केली असून आरोपींना तात्काळ अटक करून आरोपींनी आणखी काही चोऱ्या केल्या आहे का याचा सखोल तपास करत आहोत.
     तरी पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शेती साहित्य चोरी, गुरेढोरे चोरी तसेच मंदिरातील चोरी रोखता यावी याकरिता गावात तसेच शिवारात भटकंती करत असलेल्या संशयित इसमा बाबत तात्काळ जानेफळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी.
उपरोक्त कारवाई ही अनिल डोंगरदिवे पोलीस पाटील थार, श्री लाखडे माजी पोलीस पाटील खुदनापूर तसेच खुदनापूर येथील गावकरी मंडळी व पोलीस स्टेशन जानेफळ येथील ASI अरविंद चव्हाण, Hc पंढरी काकड, पो कौ देवेंद्र इंगळे विनोद फुफटे आदींनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top