
जालना/कादरी हुसैन
जालना शहर महानगरपालिकेच्या इमारतीचे विस्तारिकरणाचे काम सुरु असून या नूतन इमारतीत पत्रकारांना बसण्यासाठो स्वतंत्र प्रतीक्षालंयाची स्थापणा करण्याची मागणी व्हॉइस ऑफ मिडिया जाकणाच्यावतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी व्हॉइस ऑफ मिडियाच्या या रस्ता मागणीला लगेचच मंजुरी दिली आहे.
याबाबत आयुक्ताना दिलेकता निवेदनात म्हटले आहे की, शहरात महानगरपालिका स्थापण झाली असून, यासाठी इमारतीचे विस्तारिकरण सुरु असून यात स्वतंत्र कक्षा, ज्यामध्ये वार्ताकनासाठी टीव्ही संच, मिटिंग टेबल, आरामदायी खुर्च्या, वातानूकुलीत व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. याशिवाय विविध वर्तमानपत्रे सुद्धा उपलब्ध करावीत. जालना शहर महानगरपालिका हद्दीत पत्रजर भवनासाठी सुद्धा करार तत्वावर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष, अविनाश कवळे, जिल्हाध्यक्ष, राजेश भालेराव, सचिव रविकांत दानम, कोषाध्यक्ष अशोक मिश्रा, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष सुयोग खर्डेकर, लियाकत अली खान, भरत मानकर, सदानंद देशमुख, विष्णू कदम, हुसेन कादरी, शिवाजी बावणे यांची उपस्थिती होती.