मा. जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल मालकीन संगीता लाहोटीच्या खुन केल्याप्रकरणी आरोपी नोकरास जन्मठेपेची शिक्षा

जालना/ कादरी हुसैन: जालना: दिनांक २२/०१/२०२५ रोजी मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना मा. श्रीमती. वर्षा एम. मोहीते मॅडम यांनी आरोपी भिमराव निवृत्ती धांडे, वय ६४ वर्ष रा. नुतन वसाहत, अंबड रोड, जालना या आरोपीस मयत संगिता लाहोटी यांचा खुन केल्या प्रकरणी कलम ३०२ भा.द. वी. मध्ये जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावासाची शिक्षा तसेच कलम ३०९ भादवी प्रमाणे एक वर्ष कारावासाची शिक्षा व एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा करावासाची शिक्षा ठोठावली.

घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, यातील आरोपी भिमराव धांडे हा मयत संगिता लाहेटी यांच्याकडे घटनेच्या ४० वर्षापूर्वी पासुन घरकाम करत होता. दिनांक १४/१२/२०२१ रोजी ८.१५ वाजताच्या सुमारास मयत संगिता लाहोटी यांचे पती अलोक लाहोटी यांनी आरोपी यास जितेन नाथानी याचा मोबाईल नंबर का घेतो असे विचारले म्हणुन आरोपी याने आलोक लाहोटी यांना दगड फेकुन मारला व कॉलर पकडुन भांडण केले व नंतर पोलीस स्टेशन येथे आलोक लोहोटी हे आरोपी विरूध्द तकार देण्यासाठी गेला असता आरोपी याने आलोक लाहोटी याची माफी मागुण त्याच्या विरूध्द तकार देउ नका अशी विनंती केली. त्यानंतर सदरील घटनेचा राग मनात धरून आरोपी भिमराव धांडे हा दि.१४/१२/२०२१ रोजी ८.४० वाजता आरोपी हा मयत यांचा पुजा बंगला येथे गेला व तेथे मयत सांगिता लाहोटी यांच्यावर घरातील किचन रूममध्ये ओट्यावर ठेवलेल्या वेगवेगळया ०४ चाकुने मयत संगितला लाहोटी यांच्या छातीवर, पोटावर, बरगडीवर, डाव्या हाताच्या मनगटावर चाकुने भोकसुन त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा निघुण खुन केला. म्हणुन फिर्यादी यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा कं. ९३७/२०२१ कलम ३०२,४५२,३०९ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता अॅड उज्ज्वल निकम यांनी एकूण २२ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, वैदयकीय अधिकारी व इतर साक्षीदार तसेच तपासीक अधिकारी श्री. प्रमोद बोंडले, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

मा. न्यायालयापुढे सरकारपक्षातर्फे आलेला साक्षीपुरावा व दोन्ही बाजुचा युक्तीवाद लक्षात घेवून मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना मा. श्रीमती. वर्षा एम. मोहीते मॅडम यांनी आरोपी भिमराव निवृत्ती धांडे, वय ६४ वर्ष रा. नुतन वसाहत, अंबड रोड, जालना या आरोपीस मयत संगिता लाहोटी यांचा खून केल्या प्रकरणी कलम ३०२ भा.द.वी. मध्ये जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावासाची शिक्षा तसेच कलम ३०९ ‘भादवी प्रमाणे एक वर्ष कारावासाची शिक्षा व एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा करावासाची शिक्षा ठोठावली

प्रकरणात सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. श्री. उज्ज्वल निकम तसेच जिल्हा सरकारी वकील अॅड. बाबासाहेब इंगळे तसेच फिर्यादीचे वकील अॅड. मनिष राउत यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस
अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधीकारी जालना, श्री. सुभाष भुजंग, तत्कालीन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली तपासीक अंमलदार श्री. प्रमोद बोंडले, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांनी तपास केला. या प्रकरणी श्री. संदीप भारती, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सदर बाजार, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top