
चायनीज मांज्यामुळे देशभरात अनेक अपघात झाले आहेत. आपल्या शहरातही पंधरा ते सोळा अशा घटना नोंदवण्यात आल्या आहेत जिथे मांज्यामुळे मान, गळा, पाय कापल्याचे किंवा पाठी-पोटावर गंभीर जखमा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. चायनीज मांजा अतिशय घातक असून, त्याचा वापर टाळणे अत्यावश्यक आहे.
इंजिनियर वाजेद कादरी यांनी पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, आपल्या कृतीमुळे कोणत्याही व्यक्तीला त्रास किंवा हानी होऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. पैगंबर मोहम्मद साहेबांच्या आदेशानुसार, आपल्या कोणत्याही कृत्याने इतरांना हानी पोहोचता कामा नये.
पोलीस विभागाने चायनीज मांज्याच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली असून, अशा मांज्याचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी या नियमांचे पालन करावे आणि अशा प्रकारांपासून सावध रहावे.
वाजेद कादरी यांनी युवकांना विनंती केली आहे की, शहराच्या शांती आणि प्रगतीसाठी सकारात्मक पाऊल उचला. चांगल्या कामांमध्ये सहभाग घ्या आणि कोणतेही हानिकारक कृत्य आपल्या हातून होणार नाही, याची खबरदारी घ्या.
सुरक्षेसाठी सावधानता बाळगा आणि आनंदाने सण साजरा करा!