
जिल्ह्यातील आणखी एक अधिकारी मंत्रालयीन सेवेत
सतिश मवाळ
राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांच्या खासगी सचिवपदी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वन्हाडे यांची नियुक्ती झाली आहे. वऱ्हाडे यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील आणखी एका अधिकाऱ्यास मुंबई येथे मंत्रालयीन सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे. उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे मूळचे मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी वणी, मोर्शी, चांदुर रेल्वे, कारंजा लाड येथे उपविभागीय अधिकारी तर बुलढाणा, यवतमाळ येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. सध्या ते नांदेड येथे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मूळगावी दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी बुलढाणा येथून बारावी आणि डीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. अध्यापनाचे कार्य करीत असतांना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. त्याद्वारे त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.
समाजशील अन खिलाडूवृत्तीचा अधिकारी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे हे समाजशील अन खिलाडूवृत्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच हिरिरीने सहभाग असतो. या सोबतच ते सर्वोत्तम खेळाडू आहेत. क्रिकेट, रनिंग, सायकलिंग, खो-खो, हॉलीबॉल खेळात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक मॅरेथॉनमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच जगातील अतिशय खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन त्यांनी वेळेत पूर्ण केलेली आहे. सुदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्याला मंत्रालयीन सेवेचा वारसा
जिल्ह्याला मंत्रालयीन सेवेचा वारसा आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी मुंबई मंत्रालयात उत्तम कार्य केले आहे. विद्याधर महाले सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आहेत. मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मंत्रालयात विविध विभागात काम केले. त्यांना मंत्रालयीन प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे विशेष कार्य अधिकारी होते. आता ललीतकुमार वऱ्हाडे यांची आदिवासी विकास वेऊन सैन्य व पोलीसमध्ये दाखल मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने मंत्रालयीन कामकाजाचा वारसा पुढे चालू राहणार आहे.