पीक पाहणी मध्ये चिया पिकाची नोंद करा; महसूल मंत्र्यांना राजकुमार शिंदे यांचे साकडे

वाशिम : सध्या रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात रब्बीचे पिक म्हणून गहू हरभरा या पिकांच्या पेरण्या केल्या जात आहेत .मात्र गेल्या दोन- तीन वर्षात गव्हाला पिवळसर तसेच हरभऱ्यावर मर या रोग पडून उत्पन्न कमी आणि खर्च जास्त येतो.

फुलचंद भगत वाशिम:-सध्या रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात रब्बीचे पिक म्हणून गहू हरभरा या पिकांच्या पेरण्या केल्या जात आहेत .मात्र गेल्या दोन- तीन वर्षात गव्हाला पिवळसर तसेच हरभऱ्यावर मर या रोग पडून उत्पन्न कमी आणि खर्च जास्त येतो. शेतकरी पेरणी केली तेव्हापासून ते कापणी पर्यंत जेवढे पेरले तेवढे उत्पादन होणेही कठीण झाल्यामुळे शेतकरी वर्ग सध्या सुपर फूड म्हणून ओळखले जाणारे चिया सिड हे कमी कालावधीत आणि कमी खर्चात अधिकतम उत्पन्न देणारा पीक म्हणून  शेतकऱ्यांत  आकर्षणाचा विषय ठरला आहे‌. हजारो हेक्टर वर सध्या चीया सिड पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली असताना महाराष्ट्रात शासनाच्या पीक पेरा नोंदणी ॲप मध्ये चिया हे ऑप्शन नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. त्यामुळेच चिया पिकांचिही नोंदणीया ॲप मध्ये समावेश करावा कारण पीक नोंदणी ही करण्याकरिता सात दिवसाचा कालावधी उरलेला असताना वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी चिया या पिकांची पेरणी केल्या असताना चिया याचीही नोंदणी व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजकुमार शिंदे यांनी महसूल मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. कारण भविष्यात रब्बीला मात म्हणजेच चिया हाच पर्याय शेतकऱ्यांना उरणार आहे अधिकतम बाजार मूल्य सध्यातरी क्विंटल आला 12 हजार रुपये भाव येत असल्यामुळे आणि रब्बीतील हरभरा व गहू या पिकाला पेरणी उत्पादन आणि बाजार भाव हा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही . चिया पिकांची ही पीक पाहणी नोंदणी मध्ये समावेश झाल्यास भविष्यात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला याची नोंद राहील असे यावेळी संबंधित महसूल मंत्र्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top