
लोणार/उध्दव आटोळे
प्रजासत्ताक दिनाच्या पृष्ठभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अखेर आपल्या पालकमंत्र्यांची बहुप्रतीक्षित यादी अखेर जाहीर केली आहे.बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा वाईचे आमदार मकरंद जाधव पाटील यांची वर्णी लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिना लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. दरम्यान,आजअखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून, या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्हाचे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचे लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.मकरंद जाधव यांना बुलढाण्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे.