
लोणार (प्रतिनिधी )लोणार
मराठी पत्रकार परिषद संलग्नीत बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज १६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील सुमारे ८० ज्येष्ठ पत्रकारांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यामध्ये लोणार शहरातील ज्येष्ठ पत्रकार शाम सोनुने यांचा सत्कार केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप रावजी जाधव तसेच पालकमंत्री आकाशजी फुंडकर, आ. संजयजी गायकवाड, आमदार धिरज लिंगाडे,बुलढाणा अर्बन चे संस्थापक राधेशामजी चांडक, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत, यांच्या हस्ते पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. या वेळी माझे सोबत
जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ अनील मापारी बुलडाणा जिल्हा पत्रकार सघाचे मेहकर लोणार विभागीय संघटक शेख समद शेख अहमद, तसेच संघटनेचे लोणार तालुका अध्यक्ष प्रमोद वराडे, पत्रकार सदीप मापारी,लोकमतचे पत्रकार मयुर गोलेच्छा,पत्रकार
बांधवांच्या उपस्थित पुरस्कार देवुन शाल, श्रीफळ, व पुष्पहाराने सत्कार केला. ज्येष्ठ पत्रकार शाम सोनुने यांचा जिल्हा पत्रकार संघाकडून सन्मान झाल्याबद्दल जिल्ह्यातील पुरस्कार्थी व उपस्थित पत्रकारांनी गर्दे व्हॉल कार्यक्रम स्थळी असलेल्या सेल्फी पाँईटवर पत्रकार यांच्यासोबत सेल्फी काढून घेतली.