
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर शिर्डीतील भाजप महाविजय अधिवेशनात जोरदार टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कठोर प्रत्युत्तर दिलं.
शरद पवार म्हणाले, “मी 1958 पासून राजकारणात आहे आणि 1978 साली मुख्यमंत्री होतो. त्या काळात जनसंघाच्या उत्तमराव पाटील यांच्यासारख्या नेत्यांसोबत काम केलं आहे. पण, गृहमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांनी कधीही विरोधकांवर वैयक्तिक टीका केली नव्हती. अमित शाह यांना विधान करण्यापूर्वी योग्य माहिती घ्यायला हवी होती.”
ते पुढे म्हणाले, “भुज भूकंपाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी मला विरोधी पक्षात असूनही समितीवर काम करण्याची जबाबदारी दिली होती. यावरून चांगल्या नेत्यांची परंपरा दिसून येते. मात्र, सध्याचे गृहमंत्री हा दर्जा सांभाळण्यात अपयशी ठरत आहेत.”
अशा प्रकारे शरद पवार यांनी आपल्या अनुभवाचा दाखला देत अमित शाह यांना खडेबोल सुनावले.