

राहेरी/सि.राजा-संजय निकाळजे
नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरीच्या ऐतिहासिक पूलावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी बुधवार १५ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पिरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांचेसह कार्याध्यक्ष जयदीप कवाडे व जिल्ह्यातील महायुतीच्या मंत्री तसेच आमदारांना निमंत्रित केले होते. मात्र एकाही मंत्री व आमदाराने हजेरी न लावता पाठ दाखवली. मात्र पूर्व नियोजित निमंत्रित नसताना देखील आमदार सिद्धार्थ खरात यांनी केवळ फोनवर या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे यासाठी १९७८ मध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वात नागपूरवरून लॉंग मार्च काढण्यात आला. हा लॉंग मार्च औरंगाबादकडे जात असताना सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरीच्या पुलावर प्रशासनाने अडविला. तेव्हा खूप संघर्ष करावा लागला. सतरा वर्षानंतर नामांतर जरी झाले नसले तरी नामविस्तार मात्र झाला. तेव्हापासून नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी या पुलावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भव्य नामांतर स्मृती सोहळा दरवर्षीच आयोजित करण्यात येतो. याही वर्षी तो बुधवार १५ जानेवारी रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील महायुती सरकारमधील केंद्रीय आयुषमंत्री ना.प्रतापराव जाधव, कॅबिनेट मंत्री ना.आकाश फुंडकर,आ श्वेताताई महाले चिखली, आ.संजय कुटे जळगाव जामोद, आ मनोज कायंदे शिंदखेडराजा,आ. संजय गायकवाड बुलढाणा यांच्यासह महायुतीतील पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते, मात्र उपरोक्त आमदारांपैकी एकाही आमदाराची व मंत्र्याची नामांतर स्मृती सोहळ्याला शहिदांना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती नव्हती. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थिततांमध्ये उलट-सुलट चर्चा होती. तत्पूर्वी सकाळी प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी आ. सिद्धार्थ खरात यांच्याशी येण्यासंदर्भात फोनवर चर्चा केली. त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव भीमसैनिक आ. सिद्धार्थ खरात हे(पोस्टर वर फोटो किंवा नाव नव्हते तरी पण) निमंत्रित नसताना देखील शहिदाप्रती सहानुभूती दाखवून उपस्थित झाले व शहिदांना अभिवादन करून समाजाप्रती त्यांनी एक प्रकारे ऋण जोपासले. याप्रसंगी आ. सिद्धार्थ खरात यांनी मनोगत व्यक्त करताना नागपूरवरून १९७८ मध्ये निघालेला लॉन्ग मार्च राहेरी फुलावर घडविला व येथे आम्ही जगू किंवा मरु असा संघर्ष या भूमीत झाला यामध्ये परीसरातील लोकांनी त्यावेळेस खूप सहकार्य करून सहभाग नोंदवला. त्यामध्ये आपलाही सहभाग होता. येथील स्तभ हा क्रांतीचा आहे. मी प्रशासनात असतांना मला काही करता येत नव्हते. पण आता मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे यापुढचा लढा हा रस्त्यावरचा नसून विचाराचा आहे. आपण आदेश द्यावा, समाजाच्या उन्नती साठी मी काम करणार आहे. सामाजिक कार्यासाठी पक्ष नसतो. यावर्षीच नव्हे तर या अगोदरही दरवर्षी मी या ठिकाणी शहिदांना अभिवादन करण्यासाठी येत होतो, असेही त्यांनी सांगितले. प्रमुख मार्गदर्शनात प्रा जोगेंद्र कवाडे सर यांनी अनेकदा आपण येथे येतो. पण जमीन दिसते,स्मारक उभे राहत नाही. बेईमानीतून नव्हे तर बाबासाहेबांच्या भिमसैनीकाच्या घामातील पैशातून झाले पाहीजे ही माझा इच्छा होती. त्यामुळे आज आपण येथे शोर्यस्तंभाचे भूमीपूजन केले. भिमाकोरेगावचा आदर्श घेवून मी विद्यापिठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी लॉंगमार्च काढला. मोठा संघर्ष करत अनेक भिमसैनीक शहीद झाले. त्यांच्या बलीदानामुळेच नामांतर झाले. त्या नामांतराच्या शौर्य व बलीदान दिलेल्या भिमसैनीकांना अभिवादन करण्यासाठी आपण येत असतो. आपण कोणावर अन्याय करायचा नाही पण जे अन्याय करतील त्याची तक्रार न करता प्रतीकार करावा. आता आम्ही यापुढे अन्याय सहण करणार नाही. या स्मारकासाठी सर्वांनी दान द्यावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. याप्रसंगी जयदीप कवाडे, चरणदास इंगोले यांनीही आपले विचार मांडले. यावेळी उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते शौर्य स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले.
………………………………….