
जालना/ कादरी हुसैन; आज दिनांक 13/01/2025 रोजी 12:15 वाजताच्या दरम्यान राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 च्या अनुषंगाने जालना समृद्धी महामार्ग येथील गुंडेवाडी पेट्रोल पंप येथे सुरक्षित ठिकाणी वाहन चालक, वाहनधारक प्रवासी तसेच एम एस आर डी सी चे अधिकारी व मेसर्स मोटोकॉलर लिमिटेड व पार्थ रियल कॉन प्राइवेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी यांना वाहतूक नियमाची जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम रावबिन्यात आला सदर कार्यक्रमास आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे व प्रभारी अधिकारी रामदास निकम व, शकुर मोमीन पो.उप.नि,पो.अंमलदार अझहर शेख, म.पो केंद्र जालना व स्टाफ सह हजर होतो. तसेच MSRDC चे अधिकारी कोटेजा साहेब, माँतोकार्लो चे अधिकारी विश्वकर्मा साहेब,तसेच अँब्युलन्स चा स्टाफ,QRV चा स्टाफ हजर होता.
हजर सर्व स्टॉप व चालक, प्रवासी, याना मार्गदर्शन केले. आम्ही त्याना रस्ता सुरक्षा कार्यक्रम बद्दल माहिती दिली.सर्वांना वाहतूक मोटार वाहन कायद्याचे नियम पाळणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन न करणे प्रवास करताना हेल्मेटचा वापर करणे व सिटबेल्ट चा वापर करण्याचे समजावून सांगून तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये तसेच मद्यपान करून वाहन चालू नाही अशी माहिती देऊन महामार्गांवर होणारे अपघात व त्या मध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वाहतुकीचे नियमाविषयी प्रबोधन करण्यात आले. तसेच प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यांनी सुद्धा उपस्थितांना प्रबोधन केले तसेच समृद्धी महामार्ग चार ही टोल प्लाझा एन्ट्री व एक्झिट वर वाहतूक नियमाचे जनजागृती करण्यासाठी बॅनर लावनेत आले आहेत