
जालना/कादरी हुसैन
दि 06/02/2025 रोजी फिर्यादी नामे विठ्ठल पंढरीनाथ गायके, वय-29 वर्ष, व्यवसाय-ड्रायव्हर, रा.शिरनेर ता.अंबड, जि. जालना यांनी फिर्याद दिली की, दिनांक 05/02/2025 रात्री 11:00 ते दि.06/02/2025 सकाळी 06:00 वाजेच्या दरम्यान शिरनेर, ता. अंबड जि. जालमा येथुन फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोरुन ऋषीकेश बळीराम वायभट्ट रा. भिवंडी बोडखा, ता.” अंबड जि. जालना यांचे मालकीची क्रुझर वाहन क्र. MH21V8830 हे 4,20,000/- रु किंमतीची कोणीतरी अंज्ञात इसमाने चोरी करुन नेली आहे. त्यामुळे अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे अंबड जालना येथे गु.र.नं. 66/2025 कलम 303 (2) भा.न्या. संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल साहेब यांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना सुचना दिल्या होत्या. सदर माहितीच्या अनुषंगाने चारचाकी वाहन चोरांची तांत्रिक व गुप्तबातमीदारामार्फत माहिती घेत असतांना माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा आरोपी नामे अब्दुल रहिम अब्दुल करीम ऊर्फ बाबा वय-53 वर्ष, रा. दिलावरनगर, बीड व आरोपी नामे अकबर हसन शेख ऊर्फ सुलतान, वय-38 वर्ष, रा. केज, जि.बीड ह.मु. म्हाडा कॉलनी, महाराणा प्रतापनगर, लातुर यांनी मिळुन केला आहे. त्याअनुशंगाने दोन्ही आरोपीतांना अनुक्रमे बीड व लातुर याठिकाणाहुन ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हयातील क्रुझर जीप ही कलबुर्गी, राज्य कर्नाटक येथे येथील इसम नामे सुशील सिधरामप्पा पांचाळ, रा. कलबुर्गी, राज्य कनार्टक याचे कडे कलरिंग करणेसाठी ठेवलेली असल्याचे सांगितल्याने सदरची क्रुझर जीप ही इसम नामे सुशील सिधरामप्पा पांचाळ, रा. कलबुर्गी, राज्य कनार्टक याचे कडुन जप्त करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि, योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, रामप्रसाद पव्हरे, गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, देविदास भोजणे, ईरशादें पटेल, सतिष श्रीवास, रमेश काळे, संदीप चिंचोले, भागवत खरात सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.