
जालना/कादरी हुसैन:
जालना जिल्हा आज नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या विरोधात, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून निषेध करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकासकामांबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला, त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
या निर्णयाच्या विरोधात ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय व निषेध करण्यात आला.
संघटनेच्या जालना चे अध्यक्ष राजेश भालेराव आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, लोकशाहीत माध्यमांना विकासकामांबाबत माहिती मिळणे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. मात्र, बैठकीत पत्रकारांना रोखून लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दाखवण्यात आला आहे.