
बुलडाणा सचिन खंडारे
सिंदखेडराजा तालुक्यातील धानोरा येथील विद्रुपा लघु पाटबंधारे धरणाच्या सांडव्यावरील पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आ मनोज कायंदे यांनी दिली आहे. सदर कामात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचेही सहकार्य लाभले आहे.
या सांडव्यातील सततच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.स्थानिक आमदार मनोज कायंदे यांनी सदर धरणाच्या सांडव्यावर पुलाची निर्मिती व्हावी यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेवून विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याविषयी सूचित केले असून सदर संस्थेने नागरिक,शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सांडव्यावरील पुलाच्या कामाला मान्यता दिली आहे.पुढील महिन्यात या विषयीचा प्रस्ताव त्वरेने पाठवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.आमदार कायंदे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना काम तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान,याच सांडव्या वरील पुलासाठी शेतकरी पाच,सहा वर्षांपासून लढत आहेत.पुलाच्या मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग देखील अवलंबविला होता.कालव्यातून पाणी सोडता येत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान होत होते तर दुसरीकडे आपल्याच शेतात जाण्यास शेकडो शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता.आता या पुलाचा प्रश्न मार्गी लागण्यास या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सोडविण्यासाठी तत्परता दाखवल्याबद्दल या प्रश्नाचा पाठपुरावा करणारे बळीवंश लोकचळवळीचे नितीन कायंदे, शरद कायंदे, अशोक मोगल,खरात, दत्ता मांटे, अरुण पाखरे, वायाळ तथा धानोरा वासीय शेतकरी व चांगेफळ, रूम्हना, तांदुळवाडी, सोयंदेव परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल.